रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (08:33 IST)

‘राजाराम’कारखान्याच्या निवडणुकीत पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छानणीमध्ये अवैध!

satej patil
आमदार सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छानणीमध्ये अवैद्य ठरले आहेत. साखर कारखान्याच्या नियमानुसार कारखान्यास ऊस न घातल्याचा ठपका ठेवून हे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त करून या निर्णयामुळे आजचा दिवस हा सहकारातील काळा दिवस ठरला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार सतेज पाटील गट आणि महाडिक गट राजकारण विभागले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूकीमध्ये या दोन गटांमुळे चुरस निर्माण होत असते. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे असतानाच आमदार सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.
 
पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छानणीमध्ये अवैध ठरले आहेत. साखर कारखान्याच्या नियमानुसार कारखान्यास ऊस न घातल्याचा ठपका ठेवून हे अर्ज बोद करण्यात आले आहेत. छानणीनंतर या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor