शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (12:30 IST)

आयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 17 कोटी रुपयांचे उत्पन्न लपवले आहे.देशमुख आणि त्याच्या कुटुंबाने अनेक बनावट कंपन्यांमध्ये पैशांचे व्यवहार केले.आयकर विभागाने(Income Tax)याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.आयकर विभागाने या संदर्भात पत्र जारी केले आहे.आयकर विभागाने सोमवारी ही माहिती दिली. आयकर विभागाने देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाशी जोडलेल्या ट्रस्टमध्ये पैशाच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचाही तपास लावला आहे सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्सेसने(Central Board for Direct Tax) स्पष्ट केले की, शोध दरम्यान असे आढळून आले आहे की 17 कोटी रुपयांचे उत्पन्न लपवले गेले आहे.
 
देशमुख कुटुंबाने अनेक बेहिशेबी आर्थिक व्यवहार केले आहेत. यामध्ये मनी लाँडरिंग,बोगस देणदारी पावत्या, ट्रस्टच्या नावाने रोख रकमेचा बेहिशेबी खर्च यांचा समावेश आहे.मनी लाँडरिंगद्वारे दिल्लीच्या बनावट कंपन्यांमध्ये 4.40 कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. ट्रस्टच्या तीन शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून 12 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरवापर झाला आहे.
 
तपासात झालेल्या खुलाशांनुसार देशमुख कुटुंबीयांचे 17 कोटी रुपयांचे उत्पन्न लपलेले आहे.अनेक बँक लॉकर्सही सापडले आहेत.तपासादरम्यान,अनेक बँक लॉकर्स संदर्भात बँकांना प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.आयकर विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिले.
 
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (71) यांच्यावर मनी लाँडरिंग आणि 100 कोटी रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहे.यापूर्वी ईडीने वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात लुक आउट नोटीस जारी केली होती.या नोटीसनंतर अनिल देशमुख यापुढे देश सोडू शकत नाही. ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत 5 वेळा समन्स बजावले आहे.पण अनिल देशमुख कधीच चौकशीसाठी हजर झाले नाहीत.