मुंबईसह राज्यात अधिक उकाडा जाणवणार
मुंबईच्या वातावरणात मार्चच्या सुरूवातीला आद्रतेच्या प्रमाणात घट झाली आहे. येत्या काही दिवसात मुंबईसह राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात अधिक उकाडा जाणवणार आहे.
रविवारच्या तुलनेत मुंबईच्या वातावरणात सध्यातरी फारसा बदल झालेला नाही. अद्यापही रात्री थंड़ आणि दिवसा तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सांताक्रूज येथे मुंबईचे कमाल तापमान 35.6 अंश तर कुलाबा येथे कमाल तापमान 32.2 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. दरम्यान मुंबई्च्या आद्रतेतही घट झाली आहे. राज्यातील विविध परिसरातही कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.