गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (07:54 IST)

स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढविली; मंत्रिमंडळ बैठकीतील मोठा निर्णय

shinde fadnais
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक  पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आले. यात शिंदे सरकारने राज्यातील नगरपालिकांतील स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारण्याचा निर्णय  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची संख्या 10 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लहान महानगरपालिकांमध्ये सदस्य संख्येच्या 10 टक्के स्विकृत नगरसेवक होऊ शकतात, असा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.
 
यानुसार मुंबई महानगरपालिका अधनियमाच्या कलम 5(1)(ब) मध्ये दहा नामनिर्देशित सदस्य व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(2)(ब) मध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाहीत किंवा दहा पालिका सदस्य, यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला. तसेच, याबाबत मा.महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांचे प्रथम अभिप्राय घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 5(1)(ब) व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 5(2)(ब) मध्ये नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या महानगरपालिकांतील नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांची संख्या पाच आहे.
 
राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. अशाप्रकारे नियुक्त केलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या ज्ञानाचा वापर करून महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
 
जाणून घ्या कुठल्या नगरपालिकेत किती स्विकृत नगरसेवक असणार?
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, आता राज्यातील महापालिकेत 5 नाही तर 10 स्विकृत नगरसेवक असणार, त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या मोठ्या महापालिकेत किमान 10 स्विकृत सदस्य असतील.
Increased the number of approved corporators; Big decision in cabinet meeting