संबंधित माहिती
- कोयना धरणातील पाणी प्रकल्पासाठी वळवावे; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- भाजप नेते किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; शिवसेना काय उत्तर देणार?
- आयएमए नाशिक अध्यक्ष डॉ. राजश्री पाटील यांच्या पुत्र आणि सुनेचे निधन
- महावितरणच्या विद्युत सहायक पदभरतीबाबत झाला हा महत्त्वाचा निर्णय
- "आम्हीपण बृजभूषण अन् योगींसोबत जेवायला बसतो"-संजय राऊत
इंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडली सर्व कार्यक्रम रद्द
संगमनेर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची तब्येत बिघडली असून 30 मेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. इंदोरीकर महाराजांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. यासंदर्भात एक पत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.
या पत्रकात म्हंटले की, इंदोरीकर महाराजांची प्रकृती बिघडली असून येत्या 30 मेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत. इंदोरीकर महाराजांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीवर पाठवले आहे. तर लवकरच बरा होऊन मी आपणा सर्वांच्या सेवेत येणार आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत, असे देखील इंदोरीकर महाराजांनी सांगितले आहे. आपल्याला होणार्या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही इंदोरीकर महाराजांनी सांगितले आहे.
दरम्यान, याआधी इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातातून इंदुरीकर महाराज थोडक्यात बचावले होते. त्यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. परंतु, त्यांच्या गाडीचा चालक मात्र किरकोळ जखमी झाला होता. परतूरमध्ये ही घटना घडली होती.
