सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (22:18 IST)

वाचा, राज्यातली लम्पी आजाराने बाधित जनावरांची माहिती

राज्यातील 33 जिल्ह्यातील 1 लाख 78 हजार 72 गोवर्गीय जनावरे लम्पी आजाराने बाधित झाले, मात्र वेळेत 100 टक्के लसीकरण पूर्ण केल्याने पशुधनाचा मृत्यू रोखता आला. यात सप्टेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्र लम्पीविरोधातील लसीकरणात स्वयंपूर्ण होणार आहे. तसेच ही लस राज्यातचं तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली आहे.
 
प्रश्नोतराच्या तासादरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लम्पी आजाराबाबत प्रश्न उपस्थित केल्या. ज्यावर मंत्री विखे पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. यावेळी विखे पाटील म्हणाले की, राज्यातील काही जिल्ह्यात लम्पी आजार बळावत होता. यावेळी केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सुचनांनुसार, जनावराचे तातडीने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला, राज्य सरकारने यावेळी वेगाने 100 टक्के लसीकरण पूर्ण केल्याने पशुधनाचा मृत्यू दर कमी झाला. यामध्ये राज्याचे विशिष्ट पद्धतीचा अवलंब करत लसीकरण पूर्ण केले. प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक आणि तीन कोटी रुपये दिले, राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने स्वीकारल्या आहेत.
 
पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. यामध्ये मृत गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासराला 16 हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र यामध्ये आणखी वाढ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.