मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 मार्च 2023 (13:24 IST)

गोपीनाथ गड स्मारक विशेष स्मारक त्या बद्दल माहिती

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील जन्मभूमीव्यतिरिक्त महाराष्ट्रात उभारण्यात आलेले हे विशेष स्मारक त्या बद्दल माहिती. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे उभारला आहे. तो स्व. मुंडे यांचा राज्यातील सर्वात मोठा पुतळा असल्याचे बोलले जात आहे. पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित शनिवार दि. 18 मार्च रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, होणार आहे. दोन एकर परिसरातील ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक सोहळ्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
 
उदय सांगळे पुढे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील जन्मभूमीव्यतिरिक्त महाराष्ट्रात उभारण्यात आलेले हे विशेष स्मारक आहे. नांदूरशिंगोटे येथे भव्य तळ्याची दूरवस्था झाली होती. या तळ्याला काँक्रिटचे अस्तरीकरण करुन आकर्षक रुप देण्यात आले आहे. मध्यभागी मुंडे यांचा १६ फुटी ब्राँझचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. स्मारकात बगीचा, लहान मुलांसाठी खेळणी, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक इ.सह सजावटीची कामे करण्यात आली आहेत. लवकरच तळ्यात बोटिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
 
असे आहे गोपीनाथ गड स्मारक!
सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दोन एकरांच्या तळ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे असताना 11 एप्रिल 2018 रोजी गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनास चार वर्षे पूर्ण झाली असून, या तळ्यात साठवणीचे पाणी होते. त्यालाच आकर्षक रुप देण्यात आले आहे.
 
या कामासाठी दोन एकरच्या परिसरामध्ये 400 मोटरचा जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा 26 फूट उंचीचा ब्रांझचा पूर्णाकृती पुतळा मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील विजय बोनदर यांनी तयार केला आहे. परिसराचे कामकाज सुशांत पाटील यांनी केले आहे. तसेच परिसराला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. 85 एलईडीची आकर्षक रोषणाई केली असून ही रोषणाई सौरऊर्जेवर चालणार आहे.
 
स्मारकाचे भूमिपूजन ११ एप्रिल २०१८ ला करण्यात आले. या स्मारकाचे काम गेल्या चार वर्षापासून सुरू होते. प्रारंभी या तळ्याची असलेली दोन एकर जागा जेसीबीच्या साहाय्याने उकरून घेऊन स्वच्छ केली तेथील अतिक्रमणे काढून टाकले.
 
तळ्याचे क्राँक्रिटीकरण, अस्तरीकरण केले, आर्किटेक सुशांत पाटील यांनी स्मारकाचे डिझाईन केले. तळ्याच्या मध्यभागी सहा फुटाचा रॅम्प करून त्यावर १६ फुटी ब्राँझ पुतळा उभारण्यात आला आहे.
हा पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्ट येथील प्रा. विजय बोंदर यांनी साकारला आहे. स्मारकात ४५० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, गार्डन, ग्रीन जिम, मुलांसाठी खेळणी, प्रसाधनगृह आदी कामे केली आहेत. तसेच, परिसरात ८५ एलईडी लाइट बसविण्यात आले असून लँडस्केप गार्डन करण्यात आले आहेत.
 
या स्मारकासाठी सात कोटी रुपये खर्च झाले असून हा निधी जिल्हा परिषद ,पर्यटन विकास महामंडळ व ग्राम विकास विभाग यांच्याकडून उपलब्ध झाला आहे. नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. असे त्यांनी यावेळी नमूद केले.
 
स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांची हजेरी राहणार असून नाशिकमध्ये अर्धा डझन मंत्री उपस्थित राहणार आहेत.
 
लोकार्पणासाठी मंत्र्यांची मांदियाळी
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा व अनुषंगिक विकासकामांसह सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दोन एकरमध्ये ‘गोपीनाथ गड’ भव्य स्मारक उभारले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत.
 
 Edited By - Ratnadeep ranshoor