शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जून 2022 (21:40 IST)

हस्तक्षेप करा; प्रवीण दरेकरांचे राज्यपालांना पत्र

pravin darekar
मविआ सरकार अंदाधुंद, घाईघाईने निर्णय घेत आहेत. त्यामुळे तुम्ही आता हस्तक्षेप करा अशा आशयाचे पत्र भाजप नेते प्रविण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवले आहे. घाईघाईनं जीआर जारी होत आहेत, हस्तक्षेप करा अशी मागणी भाजपाने केली आहे.
 
काय म्हटलं आहे या पत्रात
-राज्यातील राजकीय स्थिती ही मागील तीन दिवसांत अत्यंत अस्थिरतेची बनली आहे.
-शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनीषा जाहीर केली आहे.
-मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.
-महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
-राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णय सपाटा राबविला जात आहे.
-कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे.
-आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत.