Ram Mandir:महाराष्ट्रातील या गावातील सरपंचाला राम मंदिराचे निमंत्रण
अयोध्याचं राम मंदिरात येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. अयोध्याच्या राम मंदिराच्या उभारणीचे काम अद्याप पूर्ण झालं नाही तरीही 22 जानेवारीला उदघाटन सोहळा होणार आहे. या साठी विरोधक विरोध करत आहे. या मंदिराचे बांधकाम होण्या साठी अजून तीन वर्षे लागणार आहे.
भाजप अर्धवट कामात देखील मंदिर उदघाटनाची घाई करत असल्याचे विरोधी पक्ष म्हणत आहे. या कार्यक्रमाचं महाराष्ट्रातील दिग्गजांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
पण आता विशेष म्हणजे महाराष्ट्रात एका गावाच्या देखील या सरपंचाला कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी अनेकांना अयोध्या येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून महाराष्ट्राच्या हिवरे बाजार या गावातील सरपंच पोपटराव पवार यांना देखील अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
Edited by - Priya Dixit