बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (08:55 IST)

शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) प्रवेशपत्र जारी

शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत.त्यासाठी  cetcell.mahacet.org  या वेबसाईटवर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रेवश परीक्षा 15 सप्टेंबर ते 10ऑक्टोबर 2021 या कालावधित होणार आहे.
 
प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे ?\
- cetcell.mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटवर जा
-तुम्ही ज्या सामायिक परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे,त्या परीक्षेसमोरील प्रवेश पत्राच्या ऑप्शनवर क्लिक करा.
 
- अर्ज क्रमांक तसेच जन्मतारीख टाकून लॉगिन करा
 
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र समोर दिसेल
 
- हे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्या. परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल.
 
सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यात एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.या प्रवेश परीक्षांसाठी 226 केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत.तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून आणखी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.