शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (08:07 IST)

मनोहर मामा भोसले विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

महाराज मनोहर मामा भोसले याच्या विरोधात बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले  याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मनोहर मामा भोसले याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.उंदरगाव येथे भोसले यांचा बाळूमामा यांच्या नावाने महत्व मंदिर आहे. या मठामध्ये अनेक भाविक येतात या भाविकांकडून बाळूमामांच्या नावाने आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला होता. भोसले याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.त्यातच आता एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 376 2N,376 d, 354,385 व अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
 
संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर मामा भोसले याच्यासह त्याच्या दोन इतर सहकाऱ्यांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला,साखर,भंडरा देत त्यांनी फसवणूक केली.याप्रकरणी तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अनिष्ठ व अघोरी प्रथा,जादूटोणा आणि उच्चाटन कयदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.