मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (22:03 IST)

वाचा, शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीत काय घडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास तासभर बैठक झाली. यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन कोटी ३६ लाख रुपयांचा धनादेश दिला.
 
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दिली. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन कोटी ३६ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या वर्षा निवासस्थानी सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन या निधीसाठी दिलं आहे. कोरोना उपाययोजनांसाठी संस्थेचा हा खारीचा वाटा सहाय्यभूत ठरेल अशी आशा आहे, असं शरद पवार म्हणाले.