मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (16:11 IST)

15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसणार

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता असून 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. कोकणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
गेल्या महिन्यात मुंबई, कोकणसह विदर्भात सर्वदूर पाऊस झाला, तर मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. आता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र येत्या दोन ते तीन दिवसात पावसात घट होईल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे.  हवामान विभागाने जारी केलेल्या विस्तारित पूर्वानुमान नुसार,ह्या महिन्याच्या मध्य पासून परत एकदा राज्यात पाउस परतण्याची शक्यता दिसत आहे. येत्या आठवड्यात मात्र पावसाची ओढ कायम राहण्याची शक्यता पण IMD, ने दर्शविली आहे.