शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (15:17 IST)

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ITMS प्रणाली बसवली जाणार

devendra fadnavis
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचे पुणे-मुंबई एक्सप्रेसवर अपघाती निधन झाले. या संदर्भातील मुद्दा आज विधासभेच्या पावसाळी अधिवेशनात कॉंग्रेस आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. लक्षवेधीच्या माध्यमातून गायकवाड यांनी विनायर मेटे यांच्या अपघाताचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी अचूक लोकेशन मिळाले यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) प्रणाली बसवली जाणार आहे’, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 
विनायक मेटेंच्या अपघातानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले गेले आहे. यावर कॉंग्रसे आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच, त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.