1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (14:37 IST)

Rain Update: राज्यात पावसाची दमदार हजेरी

rain
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरीत झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील एक-दोन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील काही दिवस उघडीप घेणारा पाऊस आता रविवारपासून एकदा सक्रीय झाला आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पूर्व मराठवाड्यात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 
आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी पहाटेपासून राज्यभरात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची रिपरिप पाहायला मिळतं आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याआधी दोन दिवस पावसानं उघडीप दिली होती. बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. कोकणातही पाऊसाची शक्यता आहे.कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातही पूर्व विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पावसाचा जोर वाढणारबंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरीत झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील एक-दोन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 
 
नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीतील घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. घोटी, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.