सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (15:34 IST)

Accident : सैन्य दलाचा गाडीच्या अपघातात सांगलीच्या जवानाचा मृत्यू

जबलपूरहून बंगळुरू जाणाऱ्या सैन्यदलाच्या गाडीला एका खासगी टँकर ने धडक होऊन अपघात झाला. या अपघातात सांगलीतील एका जवानाचा मृत्यू झाला. तर एक जवान गंभीर जखमी झाला. 

जबलपूरहून सैन्यदलाचे एक वाहन बंगळुरू जात होते.दुपारी बारा वाजेच्या सुमारासजबलपूर जवळ पाठीमागून येणाऱ्या एका खासगी टँकर ने सैन्यदलाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात सांगलीजिल्ह्यातील लोणारवाडी गावाचे सुपुत्र पॅरा कमांडचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा दुर्देवी मृत्यू झाला तर एक अन्य जवान गंभीर जखमी झाला. 

अपघातानंतर तातडीनं पोपट खोत यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 
त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या गावी कळतातच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. 

34 वर्षीय पोपट खोत यांचे पार्थिव त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणणार असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई, मुलगी आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.   
 




Edited by - Priya Dixit