रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:24 IST)

तलवारीने केक कापणाऱ्याला दणका

वाढदिवसाच्या पार्टीत मित्राच्या खांद्यावर बसून ‘भाई का बड्डे’गाण्यावर नाचत तलावरीने केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ‘बर्थ डे बॉय’चा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे. पंकज भानुदास चौधरी (वय २४) असे अटक केलेल्या ‘बर्थ डे बॉय’चे नाव आहे.
 
हा व्हिडिओ सोशल मीडियातून इतरत्र पोहोचवला गेला. त्यातील काही जणांनी हा व्हिडिओ पोलिसांपर्यंतही पोहोचला. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी लागलीच या प्रकाराची माहिती काढली. व्हिडिओमधील 'बर्थ डे बॉय' पंकजची ओळख पटवण्यात आली. पोलिस पथकाने पंकज चौधरी याला लगेचच अटक केली. त्याच्याकडील तलवार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी राहुल घेटे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जोशात असलेल्या या बड्डेबॉयला वाढदिवसाची रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागली.