मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:36 IST)

अडीच महिन्यांनंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहणार

शस्त्रक्रिया झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर कार्यक्रमात आणि राजकीय, सामाजिक कार्यक्रमात उपस्थितीत राहत नव्हते. तसेच हिवाळी अधिवेशनाला देखील मुख्यमंत्री उपस्थित राहिले नव्हते. पण आता अडीच महिन्यांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उद्या, बुधवारी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीच्या कण्याचा आणि मानेच्या स्नायूचा त्रास होता. सुरुवातील मुख्यमंत्र्यांनी दुखण्यावर घरीच उपचार घेतले. मात्र दुखणे वाढल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १२ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांवर एच. एन. रिलायन्स फाऊन्डेशन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल १ तास चालली आणि यशस्वी पार पडली होती. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दोन महिने मुख्यमंत्र्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.