मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (22:05 IST)

दरड कोसळून अडीच महिने उलटल्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार

राज्यात पश्चिम महाराष्ट्र, रायगड आणि चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी आणि पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. दरडी कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात दरड कोसळून अडीच महिने उलटल्यानंतर केंद्रीय पथकाला जाग आली आहे. केंद्रीय पथक पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, रायगड आणि सांगली, चिपळूणमधील नुकसानीचे पाहणी करण्यासाठी आले आहे. उद्या केंद्रीय पथक तब्बल अडीच महिन्यानंतर महाराष्ट्रात येणार आहे.
 
राज्यातील घटनेला दोन ते अडीच महिने झाले आहेत. राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे दरड कोसळल्या आहेत. या सगळ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाहणी दौरा करत आहेत. केंद्रीय पथकाचा दौरा खेड, चिपळूणमधील पुरग्रस्त भागाची पाहणी, सांगलीमध्ये दुपारी केंद्रीय पथक दाखल होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेईल. मिरज तालुका आणि इतर भागातील नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. परंतु केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दोन ते अडीच महिन्यानंतर पथक येणार आहे तर पाहणी काय करणार असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.