शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:12 IST)

महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांकाची घोषणा

'आरे ला कारे' म्हणण्याची ताकद महिलांमध्ये असली पाहिजे. महिलांवरील अत्याचार खालच्या वर्गातच होत नाहीत, चांगल्या घरातही होत आहेत. जी विशाखा समितीची स्थापन केली असली त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर  यांनी व्यक्त केली. त्याचवेळी महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांकाची घोषणा केली. 155209 या टोल फ्री क्रमांकावरुन महिलांना तक्रार करता येईल, मदत मिळू शकेल, असे त्या म्हणाल्या.
 
राज्य महिला आयोगाचा 29 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. येत्या 7  ते 8 दिवसात या टोल फ्री क्रमांक कार्यरत होईल. महिला धोरणाची अंमलबजावणीवर मी भर देत आहे. 25 किलोमीटर टॉयलेट हवे, असा नियम आहे. कर्नाटक तसे आहेत, पण महाराष्ट्रात नाही. त्याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे, त्याकडे महिला आयोगाने लक्ष दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
 
महिला धोरणाला आपण महत्त्व देत नाही, पण ते अतिशय महत्त्वाचे आहे. मंत्रीमंडळात मी भांडते. का भांडू नये, एक कोस्टल रोड झाला नाही तर... पण एकल महिला, अनाथ मुलांना पैसे मिळालेच पाहिजेत. महिला आयोग, बालकल्याण आयोगाला पैसे दिले नाहीत तर आपण राज्य कशासाठी चालवतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता निर्णय झाला आहे. जिल्हा नियोजन समितीचा 3 टक्के निधी महिला व बालकल्याणासाठी मिळेल. हा निर्णय करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे, असे मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.