शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (16:49 IST)

Jalna : माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक

rajesh rope
जालनाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके समोर माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे. माजी मंत्री शरद पवारांच्या गटाचे आमदार राजेश टोपे यांची गाडी जालन्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर उभी होती. चालक त्यात बसलेला होता. चार ते पाच अज्ञातांनी गाडीवर घोषणाबाजी करत दगडफेक केली. सुदैवाने टोपे गाडीत नव्हते. जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या निवडणुका सुरु असल्यामुळे टोपे बँकेत आले होते. 
 
या प्रकरणावर टोपे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून हल्ला करणाऱ्या लोकांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. मराठा आंदोलकांकडून ही तोडफोड केल्याची  माहिती मिळाली आहे.या तोडफोडीत टोपेंच्या गाडीच्या काचा फुटल्या आहे. 

घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज वरून अज्ञातांचा शोध घेतला जात आहे. या वेळी टोपे समर्थकांनी देखील गर्दी केली होती.  
 
Edited by - Priya Dixit