शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2022 (08:19 IST)

जितेंद्र आव्हाड यांचा मंगेशकर कुटुंबियांवर संताप; मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्यामुळे केले हे ट्विट

jitendra awhad
गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करुन संताप व्यक्त केला आहे. हा संताप व्यक्त करतांना त्यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे….#निषेद