रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 25 एप्रिल 2022 (09:13 IST)

९२ वर्षीय फायर आजी चंद्रभागा शिंदे यांच्या घरी उद्धव ठाकरे यांनी घेतली सहकुटूंब भेट

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी ९२ वर्षीय चंद्रभागा शिंदे आजींची परळ येथील घरी जाऊन सहकुटुंब भेट घेतली. राणा विरोधात मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या फायर आजी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे आज थेट आजींच्या घरी गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आजींना आंब्याची पेटी भेट दिली. तर रश्मी ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजींची लहानपणापासून पाहत असून त्या आता आजी झाल्या आहेत, मात्र त्या अजूनही युवासेनेच्या असल्याचे त्यांनी सांगितले.