1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (12:55 IST)

MPSC पास न करताही तरुणांना नौकरीची संधी

MPSC
सध्या राज्यात बेरोजगारी वाढली आहे. या मुळे  तरुण वर्ग चिंतेत आहे. राज्यात नोकरी मिळविण्यासाठी लाखो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. फार कमी जणांना या स्पर्धा परीक्षेत यश मिळते. ही एमपीएससी स्पर्धा परीक्षा कठीण असते. अनेक विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे तयारी करतात आणि या परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. तरीही त्यांना यश मिळत नाही त्यांचं सरकारी नोकरी मिळवायचं स्वप्नं पूर्ण होत नाही. आता तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. राज्य सरकार जे उमेदवार एमपीएससी परीक्षा पास करू शकत नाही त्यांना देखील नोकरी देण्याचा विचार करत आहे. ही  नौकरी सरकारी स्वरूपाची नसून कंत्राटी स्वरूपाची असेल. ही माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तरुणांना राज्य सरकार कडून कंत्राटी स्वरूपाच्या पदांवर भरतीत प्राधान्य देण्याचा विचार राज्यसरकार करत आहे. असं केल्याने तरुणांना मोबदला मिळेल आणि सरकारचे पैसे वाचतील. आणि तरुणांना चांगला पगार मिळेल.
राज्यातील तरुण एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी वर्षोनुवर्षे मेहनत करतात आणि परीक्षेत अपयश मिळत . अशा उमेदवारांसाठी ज्यांना या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षेत यश मिळतो पण मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत नाही त्यांना देखील राज्य सरकार कंत्राट स्वरूपी नोकरी देण्याचा विचार करत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. या संदर्भात अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार. असे ते म्हणाले. 

Edited By- Priya Dixit