शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (08:02 IST)

लॉकडाऊनच्या एक महिन्यात शहर वाहतूक शाखेची जम्बो कारवाई 15 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई,600 वाहने जप्त

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन जारी केला, त्या अनुषणगाने अकोला जिल्हाधिकारी ह्यांनी अकोला शहर व जिल्ह्यात काही मार्गदर्शक तत्वे जारी करून कडक लोकडाऊन लागू केला, लॉकडाऊन व संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी सर्व पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी व शहर वाहतूक शाखेला दिले. 
 
निर्देश प्राप्त होताच पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी लॉक डाऊन मध्ये विनाकारण फिरणारे व जवळ वैध कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली व विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची वाहने सरळ जप्त करून त्यांचे विरुद्ध अकोला शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये दखल पात्र गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला.