गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2023 (08:03 IST)

न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती

मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या निर्णयावर आपली मोहर उमटवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने काही दिवसांपूर्वी ही शिफारस केली होती. त्यावर केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपतींनी सोमवार (२५ जुलै) रोजी शिक्कामोर्तब करत तशी अधिसूचना जारी केली.
 
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे ३० मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार यांची उच्च न्यायालयाचे प्रभारी असल्याने मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती नितीन जामदार हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
 
दरम्यान ६ जुलै रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायवृंदाने न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. न्यायमूर्ती उपाध्याय यांची २१ नोव्हेंबर २०११ रोजी देशातील सर्वात मोठ्या अशा अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते अलाहाबाद उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor