शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:40 IST)

कसब्याची जागा भाजपकडून जाईल -संजय राऊत

sanjay raut
चिंचवडची जागा मविआच्या हातातून जात आहे, ही भाजपला समजलेली चुकीची माहिती आहे, कारण चिंचवडची जागा आमच्याकडे नव्हतीच. ती जाण्याचा प्रश्नच नाही. उलट 30-35 वर्षे भाजपकडे असलेली कसब्याची जागा आता त्यांच्या हातून जात आहे, ही खरी बातमी आहे. चिंचवडची जागा कोण जिंकेल हे सांगता न येणं, हा देखील एकप्रकारे भाजपचा पराभव आहे, अशा शब्दात खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला.
 
राऊत म्हणाले, कसबा आणि चिंचवडमधील निवडणुका आपण हरतो आहे, हे लक्षात आल्यानंतर तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू केला. पोलीस यंत्रणा हाताशी धरून तुम्ही राज्य करणार असाल तर हे सरकार कोलमडून पडेल.
 
2024 मध्ये सगळय़ाचा हिशेब होईल
 
सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन चीट देण्यात आली. पण दुसरीकडे जो जाब विचारतो, त्याला तुरुंगात टाकायचं. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचे असे षडयंत्र रचले जात आहे, पण जनता 2024 ला याचा सर्व हिशेब करेल.
Edited by : Ratnadeep Ranshoor