संबंधित माहिती
- गुजरात एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
- गुजरात एक्झिट पोल : मतदारांचा कौल कोणाला? आकडे काय सांगतात?
- Exit Polls: गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता ! हिमाचलमध्ये निकराची स्पर्धा आणि दिल्लीत 'आप'ची जादू!
- Exit polls: उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यात कोण होणार मुख्यमंत्री?
- एक्झिट पोलबाबत जयंत चौधरींचा मोठा दावा, एसपी-आरएलडी युतीबाबत मोठी गोष्ट
सब्यात भाजपला धक्का? मविआचे कमबॅक
स्ट्रेलिमा संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, कसब्यात भाजपला धक्का बसू शकेल. या ठिकाणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून, काँग्रेसचे रविंद्र धनगेकर हे सुमारे १५,०७७ मताधिक्यांनी विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कसबा पेठ येथे हेमंत रासने यांना सुमारे ५९,३५१ मते तर, रवींद्र धंगेकर यांना सुमारे ७४,४२८ मते पडू शकतात, असे एक्झिटपोलमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे, चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या ३२,३५१ मतांनी विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अश्विनी जगताप यांना १,२५,३५४ मते, दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना ९३,००३ आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ६०,१७३ मते मिळू शकतात, अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
रिंगसाईड रिसर्च एक्झिट पोल काय सांगतो?
रिंगसाईड रिसर्च या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणातून चिंचवड विधानसभेची जागा भाजप जिंकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रिंगसाईड रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार उमेदवाररनिहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची विभागणी करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोलसमोर आला आहे . या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये एकूण झालेल्या मतदानापैकी भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना ४५ ते ४७ टक्के, राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना ३१ ते ३३ टक्के तर अपक्ष राहुल कलाटे यांना १८ ते २० टक्के मते मिळू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor
Edited by : Ratnadeep Ranshoor
