गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (21:38 IST)

कवठे महांकाळ निवडणूकः आर आर आबांच्या मुलाने केली कमाल

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कवठे महांकाळ निवडणुकीला निकाल समोर आला आहे. माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर आर (आबा) पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी करिष्मा केला आहे. कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पॅनलने १० जागा मिळवून मोठा विजय संपादन केला आहे. त्यामुळे आता पाटील यांच्या नेतृत्वात पॅनलने एकहाती सत्ता संपादन केली आहे. विरोधात असलेल्या शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला आहे. तर एक जागी अपक्ष निवडून आला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षाच्या नेत्यांनी रोहित पाटील यांना अडचणीत आणले होते. रोहित पाटील यांचा प्रचार आणि त्यातील भाषणे ही चांगलीच गाजली. त्यावेळी ते म्हणाले होते की, निकालानंतर तुम्हाला माझा बाप म्हणजेच आर आर आबांची आठवण येईल. आणि आता निकालानंतर ते स्पष्ट झाले आहे. निकाल लागल्यानंतर रोहित पाटील यांनी प्रतिक्रीया दिली असून जे बोललो होते ते मी करुन दाखविले आहे. निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिशही म्हटलं गेलं. माझ्या बापाची केवळ पुण्याई आहे, असे ते म्हणाले. आता मात्र, माझ्या वडिलांची त्यांना नक्कीच आठवण येईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.