मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (21:20 IST)

मंदिरातून थेट देवच गेले चोरीला, नुकतीच केली होती स्थापना

नाशिकमध्ये थेट मंदिरातूनच देव चोरून नेण्याचा  प्रकार सिडकोतील उत्तम नगर परिसरात घडला आहे. यामुळे देवाच्या भक्तांनी पोलिसांच्या ठाणे रूपी मंदिरात धाव घेतली असून देव चोरणाऱ्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी विनंती अंबड पोलिसांना केली आहे.
 
साधारपणे  एक महिन्यापूर्वी उत्तम नगर येथील एकता चौक परीसरात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली होती. तेथील स्थानिक नागरिकांनी दीड किलो पितळाच्या “दत्ताची मूर्ती” ची व मंदिराची स्थापना मोठ्या थाटामाटात व उत्साहात केली. त्या घटनेस एक महिना पूर्ण होत नाही, तोच चोरट्यांनी थेट याच देवाच्या मंदिरातच हात घालून मूर्तीची चोरी केली आहे. 
यामुळे संतप्त झालेल्या दत्तभक्त मंडळींनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत चोरांना शोधण्यासाठी तक्रार अर्ज केला आहे.