गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (11:48 IST)

Khandwa: मध्यप्रदेशातील खंडवा येथे 4 पायांच्या मुलीचा जन्म

Khandawa : मध्यप्रदेशातील विदिशा मध्ये एका महिलेने चार पाय असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. बाळ आणि आई दोघेही बरे आहे. डॉक्टरांनी मुलीला चांगल्या उपचारासाठी भोपाळला रेफर केलं आहे. कुरवई  तालुक्यातील जोनाखेडी गावातील फुलसिंग प्रजापती आणि धनुषबाई प्रजापती यांच्या कडे मंडी बमोरा सरकारी रुग्णालयात मुलीचा जन्म झाला. या मुलीला जन्मतः चार पाय आहे. ही बातमी सोशलमिडीयावर वेगानं पसरली आणि चर्चेचा विषय बनली. या जोडप्याला अजून तीन मुली आहे. फुलसिंग गावात मजुरी करतो. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या मुलीला इशिओपॅगस' झाला आहे. ही एका प्रकाराची शारीरिक विकृती आहे. ही विकृती गर्भाशयात वाढणाऱ्या बाळांमध्ये शरीराच्या खालील भागाचा अतिरिक्त वाढ झाल्यामुळे होते. ही  विकृती हजारो मुलांपैकी एखाद्यात  होते. सध्या बाळाची प्रकृती चांगली असून तिला चांगल्या उपचारासाठी विदिशा रेफर केले नंतर तिला भोपाळला रेफर करण्यात आले. 

फुलसिंग मजुरी करतो. त्याला आपल्या कुटुंबाचे सांभाळ करते कठीण होत आहे. त्याने आर्थिक मदतीसाठी प्रशासनाला आवाहन केले आहे. 
 




Edited by - Priya Dixit