1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 सप्टेंबर 2023 (17:42 IST)

Khed : गणपतीचं डेकोरेशन करताना आगीत तरुणाचा मृत्यू

सध्या गणेशोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन घरोघरी करण्यात आले असून गणपती आरास करताना डेकोरेशनच्या लाइटिंग मध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली या आगीत तरुणाचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. 
 
सदर घटना खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे घडली आहे. राहत्या घरात गणपतीसाठी आरास करण्यात आली असता विद्युत सजावट करण्यात आली असून विद्युत लाईनीत शॉट सर्किट होऊन आग लागली. ही आग पसरली आणि त्यात होरपळून घरात झोपलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. वैभव गरुड असे या तरुणाचे नाव आहे. या आगीत सजावट जळून खाक झाला. या घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी राजगुरूनगरात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.     
 
Edited by - Priya Dixit