गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : रविवार, 24 सप्टेंबर 2023 (16:56 IST)

National Daughters Day 2023 wishes : राष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा मराठी

राष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा-
* मुली म्हणजे भूतकाळातील गोड आठवणी,
 वर्तमान काळातील आनंदी क्षण 
आणि भविष्य काळातील आशा आणि आश्वासन असतात
अशा सर्व मुलींना 
कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* एक तरी मुलगी असावी, 
कळी उमलताना पाहता यावी,
 मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.
 कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, 
अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते
 मुलींना जगवा, मुलींना वाचवा.
 कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* लेक वाचवा, देश घडवा. 
कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे,
 तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे. 
कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* माझा श्वास तू, माझा जीव तू, 
माझ्या जगण्यासाचा अर्थ म्हणजे आपली  छकुली. 
कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, 
तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले.
 कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* मुलापेक्षा मुलगी बरी, 
प्रकाश देते दोन्ही घरी
कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* मुलगा असेल वंशाचा दिवा ,
मुलगी त्या दिव्याची वात आहे
लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
 
* मुलीला समजू नका भार
तिच आहे तुमच्या जगण्याच्या आधार
कन्या दिनाच्या शुभेच्छा 
 






Edited by - Priya Dixit