Marathi Biodata Maker

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम सहा दरवाजे उघडले

बुधवार, 18 जुलै 2018 (09:31 IST)
राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यात कोयना धरण सातारा येथे असून मोठय़ा प्रमाणात या भागात पाऊस कोसळत असून आहे. पावसाने जूनचा पूर्ण  अनुशेष जुलैमध्ये भरून काढला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. २४ तासात तब्बल ७ टीएमसी पाण्याची वाढ झाली तर पाटण, कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले आहे. या धरणातून ५००० क्युसेस पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले. तसेच पायथा वीज गृहातुन २१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा वेग पाहता सध्या ७१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये केला जात आहे. कोयना धरणामध्ये ७८ टीएमसी पाणीसाठा आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. माण, खटाव व फलटण तालुके वगळता सर्वत्र पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

गुन्हे शाखेने पुण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकला; तीन अल्पवयीन मुलांसह १५६ श्रीमंत व्यक्तींना ताब्यात घेतले

१५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलामुलींचे आधार कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते, माहिती जाणून घ्या

LIVE: वर्ध्यातील ४१,३४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

वर्ध्यातील ४१,३४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

वनप्लस टर्बो 6X आणि 6X प्रो चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले, किंमत वैशिष्टये जाणून घ्या

पुढील लेख
Show comments