कोल्हापूर : गाढवाचा वृद्धावर जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात एका वृद्धावर गाढवाने जीवघेणा हल्ला करण्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.या घटनेत वृद्धाला जबर मार लागला आहे. सदर घटना सीसीटीव्हीच्या केमेऱ्यात कैद झाली आहे. गाढव हा शांत स्वभावाचा प्राणी मानला जातो. गाढवाने वृद्धावर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना 7 जुलै रोजीची आहे. व्हिडीओ मध्ये दिसत आहे की रस्त्याच्या कडेला एक गाढव उभे आहे. रस्त्यावरून एक वृद्ध व्यक्ती जात असताना गाढव अचानक त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांचा चावा घेतो. आणि त्यांना पायदळी तुडवतो.
त्या वृद्धाला वाचविण्यासाठी काही लोक धावत येतात आणि गाढवावर काठ्याने वार करतात. या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती बेशुद्ध होते. आजूबाजूचे लोक वृद्धाच्या मदतीसाठी पुढे येऊन गाढवाला हाकलतात तरीही गाढव वृद्धाला पायदळी तुडवत असतो. मग एक माणूस येतो आणि काठीने गाढवावर वार करतो. आणि गाढवाला पळवून लावतो.
Edited by - Priya Dixit