शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (14:46 IST)

कोल्हापूर : कळंबा कारागृह अधीक्षकांवर कैद्याचा हल्ला

jail
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात एका कैद्याने कारागृह अधीक्षकांवर हल्ला केला आहे. कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदलकर यांच्यावर मंगळवारी बरंक तपासणीवेळी हा हल्ला झाला. जन्मठेप भोगत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृह अधीक्षकावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षकांच्या हाताला इजा झालीय.
 
रत्नागिरीहून कळंबा कारागृहात आणलेल्या कैद्याने मंगळवारी सकाळी कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांच्यावर हल्ला केला. सकाळी ते बरंक तपासणीसाठी गेले असता ही घटना घडली. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून कळंबा कारागृहातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
अधीक्षक इंदूरकर हे मंगळवारी सकाळी कारागृहाची तपासणी करत होते. यावेळी संबधित बंदीने पत्र्याच्या तुकड्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी प्रसंगावधान राखून त्याला वेळीच रोखला. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच बाजूला केले. मात्र या हल्ल्यात इंदूरकर यांच्या हाताला दुखापत झाली. यासंबधी संशयित बंदीवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे इंदूरकर यांनी सांगितले.