सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (10:25 IST)

कोल्हापूर : लेकाचं भाषण ऐकताना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी ; म्हणाले

eknath shinde
शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर शिवसेनेचं अधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं हे पहिलंच अधिवेशन आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दमदार भाषण केलं. लेकाचं दमदार भाषण ऐकताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
 
याबाबत एकनाथ शिंदे यांनी भावनिक ट्विट केलं आहे. श्रीकांतचं भाषण ऐकताना सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला, असं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे
काय आहे एकनाथ शिंदे यांचं ट्विट?
सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेंच्या भाषणाचं कौतुक केलं
 
Edited By -Ratnadeep Ranshoor