गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (13:58 IST)

एकाच कुटुंबातील 5 जणांचा अपघाती मृत्यू

accident
रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहे. 

मिरजच्या जवळ वड्डी गावाजवळ कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने जाणारी बोलेरो गाडीत एकाच कुटुंबातील सर्व जण निघाले होते. या वेळी विरुद्ध आणि चुकीच्या दिशेने विटाने भरलेला  ट्रॅक्टरची धडक बसली आणि अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

हे सर्व कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील होते. वीट घेऊन जाणारा ट्रॅक्टर चुकीच्या दिशेने येत होता त्याला बोलेरोची धडक बसली आणि अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना मिरजच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घनस्थळी पोहोचले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 

वड्डी येथे राजीवनगर बायपासला हा अपघात घडला. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग मालगाव फाटा ते मिरज टप्पा अपूर्ण असून दोन दिवसांपूर्वी वाहतूक सुरु झाली असून वाहने उलट-सुलट धावत होती. ट्रॅक्टर देखील अशाच चुकीच्या पद्धतीने जात असताना बोलेरोच्या चालकाला अंदाज आला नाही आणि अपघात घडला. 
 
 Edited by - Priya Dixit