1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2024 (14:07 IST)

Beed : अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

बीड मध्ये मध्यरात्री  कंटेनर आणि पीकअप ची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी जोरदार होती. की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. 
 
सदर घटना गुरुवारी रात्री अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुब्या ससेवाडी गावाजवळ भरधाव वेगाने लोखंडी पाईप घेऊन येणारे कंटेनर आणि पीक अप व्हेन मध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात कंटेनर चालकासह एक जण ठार झाला आहे.  

अपघातानंतर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अपघातस्थळ गाठून वाहतूक सुरु केली. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून प्रकरणाचा तपास लावत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit