1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (16:25 IST)

Pune Accident : नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर, सुदैवाने जीवित हानी नाही

accident
Pune Accident : मुंबई -बंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात पुन्हा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी आज सकाळी नऱ्हे सेल्फी पॉईंट जवळ एका कंटेनरच्या चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेरनची एका कारला पाठीमागून जोराची धडक झाली . या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही  जीवित हानी झालेली नाही . 
 
मुंबई -बंगळुरू महामार्गावर नवले पूल भागात अपघातांचे सत्र सुरूच असून गेल्या काही वर्षांपासून सतत अपघात घडत आहेत. आज सकाळी कंटेनरने एका कारला मागून धडक दिली. या विचित्र अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी टळली आहे. 
 
कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माल वाहतूक कंटेनरच्या चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुढे जात असलेल्या कारच्या मागच्या बाजूस जाऊन धडकले.अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला.   
 
नवले पुलाच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. प्रशासनाने या भागाला ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केले असून अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. तरीही या परिसरात अपघात घडतात.या भागात वाहतूक कोंडी होत असते. आज देखील अपघातानंतर वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागून वाहतूक कोंडी झाली होती. 
 
अपघातानंतर सिह्गड रस्ता वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक  आणि वाहतूक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.अपघातग्रस्त वाहनाला क्रेनच्या साहाय्याने राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकाऱ्यांनी बाजूस केले.  
 
अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. 
 
 
 

Edited by - Priya Dixit