गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 4 मे 2023 (18:16 IST)

पुण्यात भीषण स्फोट इमारत हादरली

fire
पुण्याच्या सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आगीची भयानक घटना घडली असून एका दुकानात अचानक आग लागली होती. आगीनंतर अचानक भीषण असा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की स्फोटात इमारतीला मोठे नुकसान झाल्याची बातमी आली आहे. या स्फोट 2 जण जखमी झाले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका इमारतीतील 03 दुकानांमधे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स आणि मोबाईल शॉपीची अशी दुकाने होती.
 
घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या. याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतका भीषण होता की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा आणि इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. या स्फोटामध्ये एक दुचाकी पुर्ण जळाली आहे.