मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: चंद्रपुर , बुधवार, 4 जानेवारी 2023 (11:55 IST)

Cell phone explosion खिशात मोबाईलचा स्फोट

Cell phone explosion in pocket
आजकाल लहनांपासून ते म्हातार्‍यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात मोबाईल असतोच. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल जणू काही मुलभुत गरजचं झाली आहे. मोबाईल वापरा पण काळजी घ्या कारण मोबाईलचा स्फोटा झाल्याची एक धक्कादायक बातमी चंद्रपुर शहरातून पुढे आली आहे. ज्याप्रमाणे आपण सगळे आपल्या खिशात मोबाईल ठेवतो त्याच प्रमाणे या व्यक्तीने देखील स्वतच्या खिशात मोबाल ठेवला होता. अचानक त्या व्यक्तीस त्याचा खिसा गरम वाटू लागला. बघतो तर काय त्या व्यक्तीचा चक्क खिसा जळून खाक झाला होता आणि फोन गरम आला असुन त्यातून धूर निगत होता. तोच त्या व्यक्तीने फोन खिशातून बाहेर काढून फेकून दिला तर अवघ्या दोन मिनिटांत फोनचा मोठा स्फोट झाला.