शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2017 (11:13 IST)

कोल्हापूर : पंधरा दिवसापासून पुरात अडकलेल्या माकडांची सुटका

मागील १५ ते १६ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पुरात अडकलेल्या माकडांची रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप  सुटका करण्यात आली आहे. हे ऑपरेशन गिर्यारोहक विनोद कंबोज आणि व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी पूर्ण केले आहे.  जेव्हा ही माकडे सुखरूप बाहेर आली तेव्हा त्यांनी मोठा आनंद केला आणि एकमेकांना मिठ्या मारल्या आहेत.  
 

महराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. तर कोल्हापूरला पावसाने झोडून काढले आहे. यामुळे पंचगंगा नदीला जोरदार पूर आला आहे. पाऊस थांबत नाही त्यामुळे पुराची पातळी कमी होत नव्हती  तीन माकडं कोल्हापुरातील पोर्ले गावातल्या एका झाडावर अडकली होती. दोरखंडाच्या सहाय्यानं या माकडांना बाहेर काढण्यात यश आल आहे. थरारक रेस्क्यू ऑपरेशनदोन तास हे माकडांच्या सुटकेसाठी  सुरु होतं. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हे माकड दोरखंडाच्या सहाय्याने काठावर आले आहेत.