मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (07:40 IST)

Cryptocurrency bait क्रिप्टोकरन्सी आमिषाने लाखो रुपयांना गंडा

Cryptocurrency bait गुंतवणुकीवर अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून एकास सव्वा तीन लाखास गंडा घातला आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.
 
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णूकुमार सुरेंद्रकुमार बेटकरी (रा. रजत पार्क वनश्री कॉलनी,अंबड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
 
बेटकरी यांच्याशी जानेवारी महिन्यात इन्स्टाग्राम या सोशल साईडच्या माध्यमातून भामट्यांनी संपर्क साधला होता. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास भरघोस मोबदला मिळेल असे आश्वासन देत अ‍ॅक्सीस, आयसीआयसीआय, आयडीएफसी व येस बॅके च्या विविध खात्यात बेटकरी यांना पैसे टाकण्यास भाग पाडले.
 
एका महिन्यात बेटकरी यांनी ३ लाख २५ हजाराची गुंतवणुक केली. मात्र भामट्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मोबदला मिळाला नाही. त्यामुळे बेटकरी यांनी संबधीताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.