गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (08:46 IST)

ललित नाशिकमध्ये आला अन २५ लाख घेऊन गेला ! एका महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात !

lalit patil
पुणे येथील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील दुसऱ्या दिवशी नाशिक मध्ये येऊन २५ लाख रुपये घेऊन त्याने पलायन केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. शहरातील एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नाशिक पोलसांनी या महिलेची कसून चौकशी केली आहे. अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
नाशिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, “संशयित आरोपी ललित पाटील हा २ ऑक्टोबरला ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ३ किंवा ४ ऑक्टोबर ला नाशिक मध्ये आला होता. यादरम्यान त्याने त्याच्या ओळखीच्या शहराच्या मध्यवर्ती भागातील रहिवासी असलेल्या एका महिलेच्या घरी आश्रय घेतला होता. ही महिला हायप्रोफाईल व उच्चशिक्षित नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. ललिताचा भाऊ भूषण याने या महिलेकडे २५ लाख रुपये दिले होते, ते घेऊन ललितने पोबारा केला. या महिलेकडे पोलिसांना सुमारे ५ लाख १२ हजार रुपये किमतीची ७ किलो चांदी सापडली आहे. २५ लाख रुपये घेऊन तो धुळे, छत्रपती संभाजीनगर, सुरत, इंदूर, आणि नंतर बंगुळुरु येथे गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
 
“या महिलेचा गुन्ह्यात थेट सहभाग निष्पन्न न झाल्याने तिचा नामोल्लेख पोलिसांनी टाळला. मात्र ही महिला नेमकी कोण आहे याची उकल पोलीस तपासातून होईलच. कोणत्याही ठिकाणी गेल्यावर ऑनलाईन व्यवहार करण्याची वेळ येऊ नये आणि याद्वारे पोलिसांना कसलाही संशय येऊ नये, म्ह्नणून ही रोख रक्कम घेऊन त्याने धूम ठोकली होती. आणि याच पैशांचा वापर करून तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता. “
 
हा गुन्हा संवेदनशील असून संबंधित महिलेने अर्थसहाय्य केले म्हणून तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या महिलेला पुढील अधिक तपासासाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ.सीताराम कोल्हे यांनी दिली. या तपासात महिलेचा सहभाग निषपन्न झाल्यास तिला पुणे पोलीस अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor