शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (09:44 IST)

पुणे: नवले पुलावर ट्रकची कंटेनरला जोरदार धडक,आगीत होरपळून चौघांचा मृत्यू

accident
Pune: मुंबई -बंगळुरू महामार्गावर ट्रकची कंटेनरला जोरदार धडक बसून भीषण अपघात होऊन ट्रकला आग लागली. या आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. 
 
हा अपघात नन्हें येथील स्वामी नारायण मंदिराजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. मक्याचा भुसा घेऊन साताऱ्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने जात असलेल्या ट्रकच्या चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने समोरच्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनर रस्त्यावर उलटला. 

या धडकेमुळे ट्रकला आग लागली आणि ट्रक च्या केबिन मध्ये बसलेल्या चौघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यात लहान मुलाचाही समावेश आहे. तर दोघे जण जखमी झाले आहे. 

अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि अग्निशामण्डल घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले. 
 
 
 Edited by - Priya Dixit