1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (19:24 IST)

Pune :पुण्याचे उपनिरीक्षक गेम ॲप मधून रातोरात कोट्याधीश बनले

महाराष्ट्रातील पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक रातोरात कोट्याधीश झाले. ऑनलाइन गेम ड्रीम इलेव्हनमध्ये सब इन्स्पेक्टरने 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे उपनिरीक्षक गेल्या तीन महिन्यांपासून फॅन्टसी क्रिकेट अॅपवर एका टीममध्ये हा गेम खेळत होते.  दरम्यान, नशिबाने साथ दिली आणि संघ पहिल्या क्रमांकावर राहिले.  

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ झेंडे असे दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.  सोमनाथ हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. ऑनलाइन गेम ड्रीम 11 मध्ये सोमनाथने 1.5 कोटी रुपये जिंकले, त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.  

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे कोट्याधीश झाले आहेत.झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयात काम करतात. 

 गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते ड्रीम इलेव्हनमध्ये खेळू लागले .त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यासाठी ड्रीम इलेव्हन संघ बनवला. हा संघ पहिल्या क्रमांकावर राहिला. यानंतर सोमनाथ झेंडेने दीड कोटी रुपये जिंकले. उपनिरीक्षक झेंडे यांच्या कुटुंबात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. एकीकडे ड्रीम इलेव्हनसारख्या खेळांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. 
 
Edited by - Priya Dixit