रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात भूस्खलन! एसटी बस अडकली; १५-२० गावांचा संपर्क तुटला
महाराष्ट्रातील कोकण परिसरात रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात गुरुवारी रात्री मोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. अशी माहिती समोर आली आहे. तसेच भूस्खलन झाल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला.
मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात गुरुवारी रात्री मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रात्री घाटात मोठी दरड कोसळली, ज्यामुळे रस्त्यावर मोठे दगड आणि मातीचा ढिगारा साचला. या भूस्खलनामुळे सातारा जिल्ह्यातील साधारण १५ ते २० गावांचा रत्नागिरीशी असलेला थेट संपर्क तुटला. तर माहिती समोर आली आहे की, राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस या घाटात अडकली, त्यामध्ये शालेय विद्यार्थी, महिला आणि अनेक प्रवासी अडकले होते.
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयाच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग; ९ नवजात बालकांची सुखरूप सुटका
माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्ता सुरक्षित होईपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.Edited By- Dhanashri Naik

