संबंधित माहिती
- Student commits suicide डोकेदुखीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या
- सतेज पाटलांमध्ये हिंमत असेल तर स्वतः समोर येऊन उत्तर द्यावं : शौमिका महाडिक
- नाशिक शहरातील रस्ते होणार काँक्रिटचे; महापालिका आयुक्तांचा निर्णय
- Cryptocurrency bait क्रिप्टोकरन्सी आमिषाने लाखो रुपयांना गंडा
- काँग्रेसने अखेर विरोधी पक्षनेतेपदासाठी 'या' नेत्याला दिली संधी
Last day to pay crop insurance पीक विमा भरण्यासाठी शेवटचा दिवस
Last day to pay crop insuranceप्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी येत्या 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्यसरकारने केंद्रसरकारकडे मुदतवाढ देण्यासंदर्भात विनंती केली होती. आतापर्यंत राज्यात 1 कोटी 50 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे.
कर्जदार, बिगर कर्जदार, कुळाने अथवा भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतो. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती ती आता 3 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 31, 2023
