शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (09:15 IST)

लातूरमध्ये काँग्रेसचा सैराट आधारित सैराट झाला जी

सध्या राजकीय गाणे आणण्याचे दिवस आहेत. शिवसेना,मनसे,भाजपा नंतर आता कॉंग्रेस गाणे बनविले असून त्यांनी सैराट च्या सैराट झाला जी चा आधार घेतला आहे.यामध्ये ‘विकास झाला जी’ या लातूर कॉंग्रेसच्या प्रचार गाण्याच्या सीडीचे प्रकाशन माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आहे. लातूर जिल्हातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारासाठी हे गाणे तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील युवक वर्गाला समोर ठेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याची शब्दरचना व निर्मिती युवक काँग्रेसचे सूरज विभूते यांच्या कल्पकतेतून झाली आहे. लातूरचे गायक उत्तम भुतके आणि गायिका पटाचारा जगताप यांच्या आवाजात हे गाणं गाण्यात आलं आहे.त्यामुळे विकास असो व नसो गाणे तर आहे ना बस !